February 17, 2010

अजुन किती दिवस आपण हे निमूटपणे सहन करायचे? की यातून शिकून काही उपाय योजना करायच्या?

अजुन किती दिवस आपण हे निमूटपणे सहन करायचे? की यातून शिकून काही उपाय योजना करायच्या?

काल बडगार्डेन जवळ "पुण्यनगरी - शिक्षणाचे माहेर आपले स्वागत करत आहे" ही पाटी वाचून मन एक-दोन दिवसात घडलेल्या घड़ामोडीचा विचार करू लागले.

पुण्यातील बौम्बस्पोट नंतर सामान्य माणसाचा सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य माणूस फक्त प्रतिक्रिया देवू शकतो. त्याच्या हातात काहीही नाही. तो राजकारण्याच्या वर अवलंबून असल्याने लाचार आहे. असा सुर सगळीकड़े दिसतो आहे.

पण या मताशी मी मुळीच सहमत नाही. अर्थात याचा अर्थ आपण बंदुकी घेऊन, पोलीस वेश धारण करून, गस्त घालावी हा मुळीच नाही. पण काही गोष्टी मध्ये आपण कमी पडतो आहोत हे मानाने गरजेचे आहे.

या सगळ्या पार्श्वभूनीवर आपण (सामान्य माणसे) काय करू शकतो हे खाली शोधण्याचा प्रयत्न केला आहे. खालील प्रयत्न परिपूर्ण आहे असा दावा नाही; उलट जर त्यात वृद्धी किंवा सुधार होत असेल तर जरूर सुचवावे.

१. आपतकालिन स्थिती व्यवस्थापन कार्यशाळा
खुपदा आपतकालिन स्थिती मध्ये काय केले पाहिजे हेच मुळी माहीत नसते. नागरी सवरक्षण हा विषय शाळेत होता पण त्यात नैसर्गिक आपत्ति किंवा युद्धमय परिस्थिति बद्दल शिकवले होते. आज आतिरेकी हल्ले हेच लक्ष ठेउन कार्यशाला ठेवता येइल. मला वाटते दोन किंवा तीन तास ही कार्यशाला चालू शकते. यासाठी निवृत लश्करी आधिकारी, होमगार्ड हे मदत करू शकतात. पोलिस आधीच जास्त कामाच्या खाली दबले आहेत. त्यांच्या कडून हे अपेक्षित नाही. कार्यशाला ही सुट्टीच्या दिवशी महानगर पालिका शाळेत घेऊ शकतात. सार्वजानिक गणेश मंडळेया कार्यशाळेच्या नोंदणीसाठी लोकाना मदत करू शकतात.

अपेक्षित कार्य वेळ - दोन तास
खर्च - शुन्य
जागा - महानगर पालिका  शाळा
लाभवर्ग वय गट - १८ ते ४०
वक्ते  - निवृत लश्करी आधिकारी, होमगार्ड
कार्यवाहक -  सार्वजानिक गणेश मंडळे
 
२. प्राथमिकसेवा कार्यशाळा

मुंबई हल्ला वेळी लोक जख्मीना चुकीच्या पद्धतीने उचलताना किंवा नेताना दिसले. याचे कारण मानवी स्ट्रेचर कसे बनवावे? कशा पद्धतीने उचालावे याचे शिक्षण मिळालेच नाहीये. आज लोक इंजिनिअर होतात पण या गोष्टी अभ्यासात नव्हत्याच किंवा दुय्यम होत्या. त्या दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. आज त्या प्रत्येकाला त्या शिकाव्या लागणार आहेत. या कार्यशाळेत प्रात्राक्षिके आणि सामन्याचा प्रत्यक्ष सहभाग मह्त्व्याचा आहे.


अपेक्षित कार्य वेळ - एक  तास
खर्च - शुन्य
जागा - महानगर पालिका  शाळा
लाभवर्ग वय गट - १८ ते ४०
वक्ते  - सरकारी  डॉक्टर
कार्यवाहक -  सार्वजानिक गणेश मंडळे

३. सुरक्षेविषयी जागरूकता
मला वाटते यात सरकार आपले काम करीत आहे पण ते तोडके पडत आहे. मी एक सोपा पण प्रभावी उपाय सुचवित आहे. खालील यादी वाचा.
  • सार्वजनिक ठिकाणी सतर्क रहावे.
  • कोणत्याही लावारिस वस्तुला स्पर्श करू नये.
  • लावारिस वस्तुची माहिती ताबडतोब पोलिस कण्ट्रोलरूमला द्यावी
  • संशयास्पद लोक, हालचाली यांची माहिती ताबडतोब पोलिस कण्ट्रोलरूमला द्यावी. 
  • पोलिस  कण्ट्रोलरूम क्रमांक १००
वरील यादी ही खुप सर्वस्वीकृत आहे. पण ही फक्त सार्वजनिक ठिकाणी (जसे बसस्टैंड, रेलवे स्थानक् , विमानतळ, रिक्शा थांबा) इथे लावून उपयोगाचे नाही. याची चालती बोलती जाहिरात झाली पाहिजे. यासाठी वरील यादी ची प्रत कडून ज्यांचा कड़े चार चाकी वाहन आहे त्यानी जास्त लोकाना दिसेल अशी लावता येईल. जरा कल्पना करा पुण्यातील सर्व चारचाकी च्या मागे जर जाहिरात लागली तर ती किती तर पट जास्त लोकापर्यंत पोहोचेल.


खर्च - एक रूपया
जागा - चारचाकी
लाभवर्ग वय गट - सर्व
कार्यवाहक -  सामान्य
 



मला वाटते आपतकालिन स्थिती व्यवस्थापन कार्यशाळा, प्राथमिकसेवा कार्यशाळा या आज उपलब्ध नाहीत. कदाचित आज हे शिकण्यासाठी  थोड़ी पैशाची गुंतवणूक करावी लागेल. पण ती काही वर्ग नक्कीच करू शकतो.

मी वरील कोर्स साठी काही लिंक्स मिळतात का ते शोधतोय. पण तुम्हाला जर काही कोर्सेस माहित असतील तर कृपया मला पाठवा. मी पोस्ट अपडेट करीन.

नुसती बघ्याची भूमिका घेण्यापेक्ष्या काहीतरी उपाय करण्याचा माझा हेतू आहे. उगाच पोलीस, राजकारणी मंडळी, परकीय धोरण यांना शिव्या देऊन काहीही होणार नाही. आपणच आपले हात बळकट केले पाहिजेत.