December 17, 2009

Seventeen Hours

ते १७ तास !

"अभिजीत ....अभिजीत ...." मला कोणी तरी हाक मारल्याचा आवाज आला आणि मी खाडकन जागा  झालो. रात्रीचे फार नाही; जेमतेम ११.४५ वाजले होते. समोर बाबाचा चिंतित चेहरा पाहून मनात लाखो विचार येउन गेले.  मी पटकन सावरलो. "काय झाले? सगले ठीक आहे ना?" मी बाबाना विचारले. "गोरे पप्पाचा (माझे सासरे) फ़ोन होता.  आईना (सासु बाईना) बरे वाटत नाहीये. आपल्याला लगेच बोलावले आहे. तुझा फ़ोन आउट ऑफ़ रीच येत होता.म्हणून मला केला."  बाबा एका दमात म्हणाले. इतक्यात दीपा  जागी झाली.

 गोरे पप्पा मुंबई हून ACP म्हणुन नुकतेच रिटायर झालेले. आता मुंबई बास आणि निवांत राहता यावे म्हणून मी आणि दीपा नेच पुण्याच्या (बालेवाडी) या स्कीम मधे फ्लैट घेण्यासाठी आग्रह धरला होता. आज मगलवार अणि परवा म्हणजेच गुरुवारी याच फ्लैट ची  वास्तुशांति आईने ठरवली होती. 'जेवंयाच काय करायचे? मेनू काय?' यासाठी ८.०० वाजता दीपा चा आणि आईचा फ़ोन झाला. या बातमी वर दीपा काय पण मी पण विश्वास ठेवू शकत नव्हतो. कारण आईना आज पर्यंत दवाखाना, डॉक्टर याची गरज फारशी पडलीच नव्हती.

घरात होती तेवढी कैश घेउन मी, दीपा अणि बाबा बालेवाडीला निघालो.काय झाले आहे याचा काहीच अंदाज़ बांधता येत नव्हता. इतक्यात गोरे पप्पाचा फ़ोन वाजला.

गोरे पप्पा :- "कुठे आहात?"
मी :- "सुस फाटा" 
गोरे पप्पा:  - "लवकर या"  फ़ोन बंद.

दीपा चा धीर सुटत चालला. घरी पप्पा अणि आई दोघेच. दिलेश मुंबई ला होता. नविन जागा अणि हे मोठे संकट. तिने श्रीरामाचा जप सुरु केला. मी अणि पप्पा जवळ कोणते हॉस्पिटल आहे याचा विचार करू लागलो.

इतक्यात गोरे पप्पाचा परत फ़ोन वाजला.

गोरे पप्पा :- "कुठे आहात?"
मी :- "पार्किंग" 
गोरे पप्पा:  - "लवकर या"  परत फ़ोन बंद.

गाड़ी जेमतेम ठेउन आम्ही तिघेही जिनावारून सरल धावत सुटलो. घरात गेलो. तर आई पलंगावर बेशुद्ध होत्या. गोरे पप्पा, दीपा ची मावशी, संदीप (शेजारी) आईना कांदा हुन्गवत होते.

मी :- "काय झाले?"
गोरे पप्पा:  - "आज हिचा उपवास. खिचड़ी खाऊन १०.०० ला झोपली. ११.३० ला  अचानक आवाज करायला लागली. मी पाहतो तर हीला फीट आलेली. तेव्हा पासून बेशुद्ध आहे."
 मी :- "वेळ घालवायला नको. लगेच निघू. दीनानाथ हॉस्पिटल ला जायचे आहे."

मी, पप्पा आणि संदीप ने लगेच आईना उचलून गाडित ठेवले. दीपाने आईच डोके मांडीवर घेउन श्रीरामाचा जप सुरु ठेवला. वेळ जात होता तशी बेचैनी वाढत होती.

दीपा : - "किती वेळ आहे रे अजुन?"
मी:- "५ मिं."

एक एक सेकंद जास्त वाटत होता.  इतक्यात हॉस्पिटल चे गेट दिसले. आईना स्ट्रेचर घेत असताना अजून एक फीट आली. इन्चार्गे डॉक्टर नि लगेचच प्राथमिक इलाज सुरु केले. 

डॉक्टर:- "काय झाले? सविस्तार सांगा"


गोरे पप्पा:  - "आज हिचा उपवास. खिचड़ी खाऊन १०.०० ला झोपली. ११.३० ला  अचानक आवाज करायला लागली. मी पाहतो तर हीला फीट आलेली. तेव्हा पासून बेशुद्ध आहे."

डॉक्टर:- "किती फीट आल्या"

गोरे पप्पा: " तीन"

डॉक्टर:- " काही दवाई चालू आहे? BP /SUGAR? Any  allergies ?"

गोरे पप्पा:  "नाही"

डॉक्टर:-" लगेच मेंदू चा  CT SCAN करवा लागेल. बसेमेंट ला जा आणि पैसे भरा"

मी:- "मी जातो."

दीपा खुपच घाबरली होती. हातात गणपति चा फोटो ठेउन तोंडाने गणपति श्रोत्र म्हणत होती.  २० मिं मध्ये CT SCAN झाला. आईना लगेच ICU मध्ये admit केले.  आता CT SCAN रिपोर्ट ची वाट पाहत मी, दीपा अणि गोरे पप्पा बसेमेंट मध्ये थाबालो. दीपा ची मावशी , पप्पा अणि संदीप हे ICU च्या बाहेर थाबाले.

....क्रमश: