December 23, 2009

आज ऑफिस ला येताना रेडियो वर एक जाहिरात ऐकली.

जाहिरात काहीशी अशी होती -

मुलीचा आवाज -        हे दोस्ता  तू चांगला वेळ जाण्यासाठी काय करतोस?
मुलाचा आवाज १ -     मी पुस्तक वाचतो.

मुलीचा आवाज -       आरे रे ! येडा दिसतोय.

 मुलीचा आवाज  -     हे पैलवान तू चांगला वेळ जाण्यासाठी काय करतोस? 
 मुलाचा आवाज २ -   मी व्यायाम शाळेत जातो.

मुलीचा आवाज -       आरे रे ! येडा दिसतोय.

मुलीचा आवाज-        हे मित्रा तू चांगला वेळ जाण्यासाठी काय करतोस?

मुलाचा आवाज ३  -   मी फोस्टर (बीअर) पितो.
मुलीचा आवाज-        झकास !

आता यातून जाहिरातदाराला काय सांगायचे आहे? पुस्तके, व्यायाम या सगळ्या फालतू गोष्टी आहेत? आणि बीअर पिणे हीच खरी झकास गोष्ट आहे?

विचार करायला भाग पाडणारी अशी काय एकच जाहिरात नाही. अनेक आहेत. किंबहुना सगळ्याच !

माहितीचा सारखा पाउस पडत असतो. कुठे जा. जाहिरात ही आहेच.

पहिला किस्सा - एक दिवस मी ठरवून निघालो, ऑफिस ला जाताना एकही जाहिरात वाचायची नाही. मी जेमतेम कोथरुड पर्यंत गेलो असेल इतक्यात एक माणुस गाडीच्या काचेवर एक पत्रक ठेउन गेला - 'ललिता बुएटी पार्लर - फक्त महिलासाठी' (मी गाडीत एकटाच होतो. तरीही मला कदाचित बुएटी पार्लर गरज पडली तर,  रात्री बे-रात्री खोलंबा नको अशी त्या पत्रक वाटणारयाची समजूत दिसली)

दूसरा किस्सा - अचानक लक्ष्यात आले की पाकीट रिकामे आहे. ATM ला थांबुन पैसे काढूयात म्हणुन बँकेत गेलो. नेहमी प्रमाणे पैसे काढत होतो. १ मी झाला, २ मी झाले. पैसे का येत नाहीत? हे पाहत होतो. बघतोय तर काय; ATM मशीन च्या स्क्रीन वर जाहिरात.  लोन हवे आहे? हो ? नाही? म्हणजे तुम्हाला हो किंवा नाही या पैकी पर्याय निवडला शिवाय पैसे मिळणार नाहीत. ही काय जबरदस्ती ?

नको असलेली अशी किती तरी पोस्टर्स आपण रोज किमान १०० एक तरी नक्कीच पाहत असू. ही नको असलेली माहिती कुठे ठेवायची? मेंदूच चालत नाहीये.

अभिजीत

Labels:

December 21, 2009

CT SCAN चा रिपोर्ट घेउन डॉक्टर आले.

"मेंदू मधे रक्तस्त्राव झाला आहे" - डॉक्टर 

दीपा मटकन खाली बसली. तिच्या कडून काहीही बोलवत नव्हते.

"आता पुढे काय?" मी डॉक्टर ना विचारले.

डॉक्टर   - "रक्तस्त्राव चालू आहे तो पर्यंत काहीही करता येणार नाही. मी रिपोर्ट ICU च्या डॉक्टर ना पाठवला आहे. ते पुढील माहिती देतील"

मी दीपा ला घेउन ICU कड़े गेलो. ICU चे डॉक्टर राजहंस यानी रिपोर्ट पाहिला आहे सांगितले.

डॉक्टर राजहंस - "मेंदू मधे रक्तस्त्राव झाला आहे. किमान ५० सी सी रक्त मेंदू मधे आहे. रक्त दाब पण खुप वर खाली होत आहे. केस सीरियस आहे. आशा केसेस मध्ये ५०/५० चांसेस असतात. रक्तस्त्राव थांबला नाही तर त्या कोमात पण जाऊ शकतात."

दीपाचा बांध आता सुटला. ती रडू लागली. मी पण खुप shock  झालो. "पुढे काय?" तोच प्रश्न मी परत डॉक्टर राजहंस याना विचारला.

डॉक्टर राजहंस - "रक्त दाब ८० / १२० होई पर्यंत काहीही करता येणार नाही. अगदी ऑपरेशन सुद्धा ! मी न्यूरो सर्जन ना कॉल केलेला आहे. त्यांच्या सुचने नुसार आम्ही उपचार सुरु केलेत. रक्त दाब आसाच राहिला तर आई ना कदाचित वेंटिलेटर वर पण ठेवावे लागेल."

आम्ही हे सगळे सुन्न झालो.

मला हे एक वाईट स्वप्न आहे आणि मी दुसरया सेकंदाला जागा होईल असे  सारखे वाटत होते. वेळ वाईट होती कारण दुर्देवाने हे सगळे खरे होते. बुद्धि एक्सेप्ट करत होती पण मन नाही !

रात्रीचे  ३.३० वाजले. जवळ पास रक्तस्त्राव होउन  ४ तास झाले होते. आई अजुन शुद्धित आल्या नव्हत्या. आम्ही सगळे (मी, दीपा, गोरे पप्पा , पप्पा आणि मावशी) ICU च्या प्राइवेट रूम मध्ये चिंताग्रस्त बसलो होतो. कोणीही काहीही बोलत नव्हते. कधी कधी शांतता पण खुप भयानक असते हे जाणवत होते.

मधला वेळात नर्स ने दोन तीन पानी औषधांची यादी आणून दिली.

मी - "मी औषधे घेउन येतो. दीपा तू पण चल. पप्पा तुम्ही घरी जा.गरज पडली तर मी लगेच तुम्हाला बोलवून घेतो."

पप्पा घरी गेले. मला उदया साठी कुणी तरी फ्रेश  हवे होते. कारण उद्या काय वाढून ठेवले आहे हे माहित नव्हते.

मी आणि दीपा औषधे घेउन वर येत होतो.  इतक्यात मावशी दीपा ला बोलावू लागल्या. दीपा धावतच गेली.

मी आणि दीपा - "काय झाले? काय झाले?".

मावशी - "आईना शुद्ध आली आहे आणि त्या तुला बोलवत आहेत".

इतक्यात नर्स तिथे आली.

नर्स  - " दीपा कोण आहे? फक्त त्यांनीच आत या. बाकी थाबा."

दीपा आत गेली.  आई चा  आवाज येत होता. -

आई - "डोक  दुखत आहे, जरा दाब ना".


दीपा - "तुला कसे वाटते आहे?" आई काही बोलल्या नाहीत. त्याना आता गूंगी येत होती. त्या झोपी गेल्या"

डॉक्टर बाहेर आले.

डॉक्टर  -"शुद्ध आली आहे. हात आणि पाय पण हलवत आहेत. उद्या DSV (Digital Subtraction Angiogram) करवा लागेल. "

मी  - "आता धोका नाही ना?"

डॉक्टर - "नाही. .एक रक्त वाहिनी ruptcure झाली अणि रक्तस्त्राव झाला .आजून कुठल्या रक्तवाहिनी मध्ये फुगा आहे का? हे तपासवे लागेल. त्या साठी  DSV (Digital Subtraction Angiogram) करू यात."

दीपा- "परत फीट येणार नहीं ना?"

डॉक्टर - "आजून कुठे वाहिनी मध्ये फुगा असेल आणि तो फुटला तर फीट येऊ शकते."

मी - "आता लगेच नाही का करता येणार टेस्ट?"

डॉक्टर -"नाही. रक्त दाब पण अजुन वर खाली होत आहे."

दीपा -"उद्या किती वाजता होईल टेस्ट?"

डॉक्टर -"सकाळी नर्स सांगेल. चिंता करू नका. शुद्ध आली हे चांगले sign आहे. आणि त्यानी घरच्या लोकाना ओलखले आहे. बरेच केसेस मध्ये २/३ दिवस रुग्णा ला  शुद्ध ही येत नाही."

मी -"रक्त स्त्राव थांबला असेल का?"

डॉक्टर -" आता काही सांगता येणार नाही. उद्या टेस्ट नंतरच सांगता येईल."

सकाळची वाट पहाणे या खेरीज दूसरा मार्ग नव्हता.

इतक्यात परत आई चा आवाज आला -

आई - "दीपा...... दीपा.......".  दीपा आत गेली. -

आई - "डोक  दुखत आहे" . .... आम्ही सगळे बाहेरच होतो.

सगळे रात्र भर जागेच होतो. ६ वाजता सकाळी  नर्स आली. 

नर्स : "DSV ११ वाजता आहे".

आता DSV साठी आम्ही सगळे वाट पाहत होतो. वेळ जाता जात नव्हता. आईना  पूर्ण शुद्ध आलेली नव्हती. त्यानी मधल्या वेळात दीपाला , पप्पाना आणि  मला ओळखले होते. हीच काय ती जमेची बाजू होती.

११ वाजता आम्ही नर्स ला टेस्ट बाबत विचारले. तिने अजुन वेळ आहे असे सांगितले. वाजता वाजता दुपारचे ३ वाजले अणि नर्स ने आई ना टेस्ट साठी हलवाले.


Angiogram टेस्टिंग सेण्टर मधे जवळ पास सगळे हार्ट ची टेस्ट करण्या साठी आले होते.

आता ४ वाजले. फीट येउन १६ तासाच्या वर कालावधी उलटून गेला होता.  आमच्या  सगळयांचे डोळे टेस्टिंग रूम कड़े लागले होते. ४.१५ ला आईना बाहेर आणले. आई ना शुद्ध होती. त्यानी आवाज दिल्यावर हात वर करून प्रतिसाद दिला.

मावशी आई बरोबर ICU रूम कड़े गेल्या. आम्ही डॉक्टर कधी येतात याची वाट पाहत लागलो. इतक्यात डॉक्टर आले.

"गोरे का?" - आम्ही तिघेही एकदम हो म्हणालो.

"या माझ्या बरोबर" - डॉक्टर म्हणाले.

डॉक्टर : "GOOD NEWS ! DSA negative आली. आजून कोठी ही फुगा नाही परत रक्तस्त्राव होणार नाही"

आम्हाला एकदम हायसे वाटले.

दीपा- "आधीचा रक्तस्त्राव थांबला का?"

डॉक्टर "हो. जशी बाहेर कुठे जखम झाली की रक्त ची गुठली होउन रक्त थाबते. तसेच कुठेही आत सुद्धा रक्त थाबते"

मी :"पण मेदुत अजुन रक्त आहे. त्याचे काय? ते कसे काढायचे?"

डॉक्टर " त्याची गरज नाही. ते आपोआप अब्सोर्ब होईल. आता चिंता करू नका. त्या ठीक आहेत. "

पप्पा - "ती ला पूर्ण शुद्ध कधी येइल?"

डॉक्टर "लवकरच. पण गुगी राहिल थोडा काळ. बरीच औषधे चालू आहेत. "

मनावरचा मोठा बोजा उतरला होता.

आम्ही डॉक्टर नाचे आभार मानून थेट गणपती मंदिरात गेलो. देवाचे आभार मानावे तितके कमी होते. एका मोठ्या संकटातुन त्याने आमची सुटका केली होती.

नंतर च्या १० दिवसात आई ची recovery खुप समाधानी झाली. त्याना प्राइवेट रूम मधे हलवाले. आणि दोन दिवसानी discharge दिला. डॉक्टर नच्या सल्ल्या नुसार परत DSA १५ दिवसा नंतर करायची ठरले.


आज आई ठीक आहेत. पण त्याना मंगलवर ते गुरुवार मधे घडलेले काहीही आठवत नाही. मंगलवारी जेवले हीच शेवटची गोष्ट जी त्या recall करतात.


आठवत नाही म्हणून आम्ही आई ना सुदैवी मानतो. कारण आजही आम्हाला ते १७ तास आठवले तरी अंगावर काटा येतो !