January 14, 2010

तीळगुळ  घ्या, गोड गोड बोला !   

January 12, 2010

शंकर पाटील यांचे 'मिटिंग' ऐकताना हुबेहूब एक गाव, रस्ते, महादू, चावडी, रात्रीची वेळ, शंकर आन्ना, रामा धायगुडे, सरपंच  डोळ्यासमोर उभे राहतात. कितीही वेळा ऐकले तरी एवर ग्रीन असे हे कथाकथन आहे.

याच 'मिटिंग' मधील एक प्रसंग-

शंकर अण्णा ची बायको :-   "महादू? काय रे बाबा? काय मिटिंग बीटिंगला बोलवायला आला काय?"
महादू  :- "व्हय की. मिटिंग ला बोलवाया आलो"
शंकर अण्णा ची बायको :- "व्हय का? ................आर.. मिटिंगला म्हणून गेलत किर....नाही का तिथ? "
महादू  :-"म्हंजे मी बाहेर पडूस्तावर आल नव्हत"
शंकर अण्णा ची बायको :-"तुला बाहीर पडून किती टाइम झाला?"
महादू  :-"मला आता एक अर्धा घंटा झाला आसल"
शंकर अण्णा ची बायको :-"बगितालास....आर.... त्यास्नी जाउन चांगल तीन घंट झाल की !" 
महादू  :-"कुठतरी बसल असतील."
शंकर अण्णा ची बायको :-"कुठतरी? ....कुठतरी? आर बसयाच तिथच बसल असतील"
महादू  :-"म्हंजी कुठ म्हणता?"
शंकर अण्णा ची बायको :-"कुठ म्हणता.. जगाला माहिती आन तुला माहिती नाही.. आर बसल असतील तिथ त्या फुटाणीकड़ ...चंपा परटिणीकड़ !"