January 6, 2010

काल आमिर खान चा ३ idiots पहिला. घरी परत जात असताना दीपा ने मला सहज विचारले तुला काय व्हायचे होते मोठेपणी?

खरच मी काय ठरवले होते? कंप्यूटर इंजीनियरिंग हा माझा दूसरा पर्याय होता. तर पहिला होता भारतीय सेना दल !

तसा खुप सोपा वाटणारा प्रश्न मला खुप विचारत पाडून गेला. आज किती लोक त्याना जे व्हायचे होते तेच करत आहेत? कुठल्याही सरकारी ऑफिस मधील उर्मेट आधिकारी पाहिले की नक्की पटते , या माणसाला हे नक्कीच व्हायचे नव्हते ! नाही तर त्याने हे काम एन्जॉय केले असते. त्याची चिडचिड ही लोकांवर नसून स्वतः वर असते. त्याची आवड कुस्ती असेल आणि त्याला शिक्के मारायला बसवले तर काय होणार? याला १. आपली शिक्षण पद्धति आणि २. पालक हे कारणिभुत आहेत.

परवा IBN लोकमत वर अतुल कुलकर्णी ची नटरंग साठी घेतलेली मुलाखत पाहत होतो. त्याला विचारले तुझे आजच्या शिक्षण पद्धति बद्दल काय मत आहे? त्यावर अतुलने  एक खुप छान मुद्दा मांडला. 

"आजची शिक्षण पद्धति ही सगळ्यात बेस्ट (गुणी) विद्यार्थी कोण आहे हे शोधण्याचे काम करते. पण एका विद्यार्थ्यात बेस्ट (गुण) काय आहेत हे शोधत नाही."

विद्यार्थी- या शब्दाचा खरा अर्थच मुळी आपल्या सिस्टम ला समजला नाही.

अजुन एक ३ idiots चित्रपटातील एक डायलोग मला खुप पटला -

"अगर तुम वो चुनते हो जो तुम्हे पसंद हो, तो काम, काम नहीं, खेल लगेगा !"

खरे आहे.  नाही?